आषाढीची परंपरा अखंडित राहणार, बैठकीत एकमत, पालखी सोहळ्याबाबत सरकारशी चर्चा करणार
आषाढी यात्रेबाबत आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाच्या प्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा झाली.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याची परंपरा अखंडित ठेवण्यावर आजच्या बैठकीत एकमत झालं आहे. मात्र ही परंपरा अखंडित ठेवताना समाज आणि वारकऱ्यांचे आरोग्य आणि हित विचारात घेतलं जाईल. 13 जूनला पालखी सोहळा सुरू होत आहे. त्यावेळी कोरोनाची परिस्थिती कशी असेल हे पाहूनच अंतिम निर्णय घेण्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठरवण्यात आलं आहे. याबाबत सरकारशी ही चर्चा केली जाईल. त्यानंतर पालखी सोहळ्याबाबत जे ठरलंय त्यांचं वारकरी संप्रदायाने पालन करावे, असं आवाहन आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केलं आहे. तसेच इतर सात पालखी संस्थानांशी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली जाणार आहे.