माऊली कटके ठरले जायंट किलर

' शिरूरनामा 'चा अंदाज ठरला तंतोतंत खरा

0

शिरूर:शिरूर हवेली मतदार संघात महायुतीचे उमेदवार माऊलीआबा कटके हे जायंट किलर ठरणार ही’ शिरूरनामा ‘ची बातमी तंतोतंत खरी ठरली.कटके यांना विरोधकांनी गृहीत धरले नव्हते.मात्र त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे मागील पंचवार्षिक मताधिक्याचे रेकॉर्डिंगही तोडले.

शिरूर हवेली मतदारसंघात माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर आमदार अशोक पवार यांना पाचर्णे यांच्या इतका विरोधकच राहिला नाही.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे देखील त्यांच्यासोबत टिकणार नाही.पवार हे सहज विजय मिळतील असा बहुतांशी सर्वांचाच कयास होता.आमदार पवार यांची उमेदवारी आधीच निश्चित असल्याने त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती.

अखेरच्य क्षणी महायुतीने माऊली कटके यांना उमेदवारी दिली.यामुळे कटके यांच्याकडे जेमतेम १५ ते २० दिवसच हातात होते.अशा परिस्थितीत कटके हे पवार यांच्यासमोर कसे टिकतील अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या.यादरम्यान सर्वात प्रथम आमदार पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.अर्ज दाखल करताना त्यांनी शक्ती प्रदर्शन केले.यानंतर कटके यांनी देखील अर्ज दाखल करताना पवार यांच्या पेक्षा मोठे शक्तिप्रदर्शन केले.तेथून कटके यांच्या प्रचाराची सुरुवात झाली.कटके यांच्या प्रचाराचे वीस दिवस अविश्वसनीय असेच होते.कारण कटके हे शिरूर तालुक्यात जिथे जिथे जात होते तिथे शेकडोंच्या संख्येने लोक त्यांचे स्वागत करताना दिसले. तालुक्यात सर्वच भागात अशा पद्धतीचे चित्र निर्माण झाल्याने माऊली मय वातावरण तयार झाले. शिरूर शहरात आमदार पवार य माऊली या दोघांची पदयात्रा झाली.यात देखील कटके यांना शहरात जे काही प्रेम व प्रतिसाद मिळाला तो अभूतपूर्व असा होता.

एकीकडे शिरूर तालुक्यात अशी परिस्थिती असताना होम ग्राउंड असलेल्या हवेली भागात माऊली यांचाच वरचष्मा होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मतदार संघात सर्वत्र केवळ आणि केवळ माऊलीमय वातावरण दिसून आले. परिणामी माऊलींचा इतक्या मोठ्या फरकाने विजय साकार झाला.या’ मतदारसंघात पवार विरुद्ध कटके ‘,अशी लढत होणार, ‘कटके हे जायंट किलर ठरणार,’ शिरूर हवेलीत कटके यांच्या विजयाचा लंके पॅटर्न ‘ ते २४ नोव्हेंबर पासून मतदार संघात माऊली पर्व सुरू होणार ‘अशी तंतोतंत वृत मालिका शिरूर नामाने प्रसिद्ध केली. या वृत्तमलिकेंमधील प्रत्येक शब्द खरा ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.