शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:तालुक्यातील मागासवर्गीय जातीच्या सर्व घटकांचा महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांना पाठिंबा असल्याचे भाजपा मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांनी आज येथे जाहीर केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भालेराव यांनी कटके यांना पाठिंबा जाहीर केला.भालेराव म्हणाले,आमदार अशोक पवार यांनी आंबेडकर उद्यानासाठी एक रुपयाचा निधी दिला असेल तर त्यांनी सांगावे.तालुक्यातील कोणत्या गावात त्यांनी दलितांसाठी निधी दिला ते सांगावे.मतदार संघातील अनेक दलित नेत्यांवर त्यांनी अन्याय केला.त्यामुळे त्यांना मतदान करण्याचा प्रश्नच नाही.महायुतीचे उमेदवार कटके हे सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्व आहे.बचत गटांच्या महिलांना शिलाई मशीन वाटप असो,अनेकांना वैद्यकीय मदत असो अथवा मोफत तीर्थस्थळ सफर लाभ असो त्यांनी अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.दुसरीकडे महायुती सरकारने लाडकी बहीण,लाडका भाऊ, शेतकरी यांच्यासाठी सुरू केलेल्या लोकोपयोगी योजनांमुळे महायुती बद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.अशात महायुती उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.असे भालेराव म्हणाले.
शिरूर हवेली मतदार संघात हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक असून लोकशाहीचाच विजय होईल.असा विश्वासही भालेराव यांनी व्यक्त केला.दरम्यान आमदार पवार यांचे पुत्र ऋषिराज पवार यांनी आम्ही प्रचार करत असताना माझ्या गाडीवर कटके यांचे स्टिकर पाहून,नगरसेवक प्रचार करताय का उद्या आम्हीच आहोत..तुमच्याकडे बघून घेतो. अशी धमकी दिल्याचे भालेराव यांनी सांगितले. लोकप्रतिनिधीला धमकी देत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा सवालही त्यांनी केला.हिंद केसरी अभिजीत कटके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी संचालक विजेंद्र गद्रे, राजेंद्र गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ कदम, बिडगर,अनुसूचितजाती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड,गुनाटचे माजी सरपंच अनिल भालेराव,अण्णासाहेब भालेराव,सुमित सोनवणे,निर्विचे उपसरपंच अनिल कांबळे,आंबळ्याचे प्रवीण कांबळे, इनामगावचे संदीप भालेराव,कोंढापुरी सदस्य सागर मा,रामभाऊ झेंडे,मनोज गाडेकर,विशाल ससाणे,हर्षद कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.