माऊलींना मिळणारा प्रतिसाद विरोधकांची धडकी भरवणारा 

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर शिरूर हवेली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या गावभेटी प्रचार दौऱ्याला प्रत्येक गावात नागरिक उस्फूर्तपणे गर्दी करत असून त्यांना मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद विरोधकांची धडकी भरवणारा आहे.
         महायुतीच्या वतीने रांजणगाव सांडस,आलेगाव पागा,आरणगाव,उरळगाव,दहिवडी इंगळे नगर पारोडी शिवतक्रार म्हाळुंगी,टाकळी भीमा,निमगाव म्हाळुंगी,कासारी,तळेगाव ढमढेरे,शिंदोडी,निमोणे,मोठेवाडी,चव्हाणवाडी,गोलेगाव,तरडोबाची वाडी, शिवतारा पर्यटन स्थळ,बोऱ्हाडे मळा सरदवाडी,
करडे,आंबळे,न्हावरे गुनाट,चिंचणी,कोरेगाव भीमा,वाडा गावठाण,सणसवाडी, दरेकरवाडी, राऊतवाडी- वाबळेवाडी व शिक्रापूर आदी गावामध्ये दौरा करण्यात आला.प्रत्येक गावात कटके यांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.या प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थांनी कटके यांच्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्याचे जाणवले.देवदर्शनाचा लाभ मिळालेली मंडळी त्यांना भरभरून आशीर्वाद देताना दिसली.गोलेगावात कटके यांच्या गावभेट दौऱ्या दरम्यान ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या मात्र कोणत्याही उमेदवारास इतका प्रतिसाद मिळाल्याचे पाहिले नसल्याचे गोलेगावच्या माजी सरपंच सरस्वती राजेंद्र कटके यांनी सांगितले.निमोण्याचे माजी सरपंच पांडुरंग दुर्गे  म्हणाले,निमोण्यात माऊली आले तेव्हा स्वयंस्फूर्तीने ग्रामस्थ जमा झाले.यातून लोकांना बदल हवा आहे हेच संकेत मिळत आहेत.हा प्रतिसाद माऊली कटके यांना विजयाकडे नेणारा आहे.तर्डोबावाडीचे सरपंच जगदीश पाचर्णे म्हणाले,माऊली कटके यांना माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याप्रमाणेच सर्वत्र प्रेम व प्रतिसाद मिळतानाचे आशादायक चित्र आहे.यामुळे मतदारसंघात त्यांची पोझिशन भक्कम झाली आहे.माजी सरपंच वर्षा काळे,म्हणाल्या,तर्डोबावाडी ग्रामस्थ निश्चितच माऊलींच्या पाठीशी राहतील.
           दौरा केलेल्या सर्वच गावात त्यांना अद्भुत असा प्रतिसाद मिळाला.या गावांमध्ये पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांना एकत्र आणण्याचे कष्ट घ्यावे लागले नाही.ग्रामस्थ स्वतःच जमा झाल्याचे दिसून आले.आजच्या कोरेगाव भीमा, वाडा गावठाण,सणसवाडी, दरेकरवाडी, राऊतवाडी- वाबळेवाडी व शिक्रापूर या नियोजित दौऱ्यात विशेषतःकोरेगाव भीमा व सणसवाडीतील दौरा महायुतीचा आत्मविश्वास वाढवणारा तर विरोधकांच्या मनात धडकी भरवणारा ठरला.दोन्ही ठिकाणी रॅली मध्ये मोठा जनसमुदाय पहावयास मिळाला.एकेकाळचे आमदार पवार यांचे जवळचे सहकारी माजी जि प सदस्या कुसुम मांढरे,त्यांचे पती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व जिजामाता सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आबासाहेब मांढरे, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे हे आता राष्ट्रवादी (अजित पवार) गटात असून माऊली कटके यांच्या.प्रचारात त्यांनी जीव ओतल्याचे दिसून येत आहे.आजच्या दौऱ्याचे या तिघांसह या सर्व गावातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते नियोजन केले आहे.माऊली कटके यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया सर्वच गावांमधून येत आहेत.एकूणच हा प्रचंड प्रतिसाद महायुतीसाठी हे शुभ संकेत देणारा तर विरोधकांच्या मनात मात्र धडकी भरवणारा दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.