सत्ता अशोक पवारांची जहागिरी आहे का? – दादापाटील फराटे
शिरूर हवेली मतदारसंघात अँटी इन्कमबन्सी (सत्ता विरोधी )फॅक्टर काम करणार!
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:सत्ता ही कोणाची जहागिरी नसते.स्वार्थासाठी सत्तेची अपेक्षा करणाऱ्या आमदाराला यावेळी जनता चांगली चपराक देणार असून शिरूर हवेली मतदार संघात सत्तेविरोधी (अँटी इन्कमबन्सी)सूर असल्याचे दिसून येत आहे.यामुळे या मतदारसंघात बदल अटळ आहे.असा विश्वास घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार माऊली आबा कटके यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मोठ्या जोमाने प्रचार सुरू आहे.दादा पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मतदारसंघात जिथे जिथे आम्ही जात आहोत तिथे लोकांना बदल हवा आहे असे चित्र आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार अशोक पवार यांना दोन वेळा विधानसभेत जाण्याची संधी मतदारांनी दिली. सध्या पीडीसीसी बँकेचे संचालक म्हणून देखील ते कार्यरत आहेत आहे.त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची,मुलाला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.एकूणच एकाच घरात सारी पदे एकवटली आहेत. सत्ता कोणाची जहागिरी नसते.या कुटुंबाला सत्तेची चटक लागली असून पुन्हा विधानसभेसाठी मैदानात उतरून ते निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.हे आश्चर्यकारक आहे.महायुतीचे उमेदवार कटके यांची पाटी कोरी असून अल्पावधीतच ते तरुण,ज्येष्ठ नागरिकांपासून ते युवकांपर्यंत सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.जिल्हा परिषद सदस्य म्हणून विक्रमी मतांनी निवडून आलेले कटके यांनी आपल्या भागात चांगले काम केले असून गेली पंधरा वर्षापासून कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता नागरिकांना मोफत धार्मिक सहलीचे संधी उपलब्ध करून दिली आहे.त्यांच्यातील काम करण्याची ऊर्जा पाहता विकासाची एक नवी परिभाषा ते या मतदारसंघात निर्माण करतील असा मतदारांना विश्वास आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या प्रेमाखातर उपस्थित राहिलेली गर्दी व त्यांना दिवसेंदिवस मिळत असलेला प्रतिसाद त्यांच्या विजयाची खात्री देणारा आहे.असे दादा पाटील म्हणाले.
जी संस्था माझ्या वडिलांनी उभी केली तिला मी जीवापाड जपणार आहे.कधीच बंद पडू देणार नाही.असे वक्तव्य करणाऱ्या आमदार पवार यांनी कारखाना बंद पाडून आपल्या वडिलांचे नाव कमी करण्याचे काम केले.विकासाच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरण्याचे काम केले.सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असेच त्यांचे राजकारण आहे.जिरवा जिरवीच्या राजकारणात त्यांनी अनेकांना दुखावले.आहे.आता हा सगळा हिशोब पूर्ण करण्याची वेळ आली असून मतदारसंघात बदलाचे.वारे वाहू लागले आहे.मतदारसंघात फिरताना याचे स्पष्ट संकेत दिसू लागल्याचे पाटील म्हणाले
.