लाडक्या बहिणी म्हणतात लाडक्या भावालाच मतदान करणार

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:महायुतीच्या वतीने आज येथील मंगलमूर्ती परिसरातून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.घरोघरी जाऊन माहिती पत्रके वाटण्यात आली.यावेळी महिलांनी महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्याबाबत उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.लाडक्या भावालाच मतदान करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

येथील मंगलमूर्ती नगर येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.नगरसेविका अंजली थोरात,केतन जाधव,भाजपा अल्पसंख्यांक सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष रेश्मा शेख,शिवसेनेचे शहरप्रमुख मयुर थोरात,भाजपचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष एजाज बागवान,शिवसेनेचे युवा शहरप्रमुख सुनील जाधव,आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव,राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष श्रुतीका झांबरे,शिवसेना शहर संघटक सुरेश गाडेकर,दादाभाऊ लोखंडे,अविनाश जाधव,स्वप्नील रेड्डी,अतुल गव्हाणे,सुवर्णा सोनवणे, प्रिया बिरादार,रश्मी क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

मंगलमूर्ती नगर बरोबरच प्रीतम प्रकाश नगर भागातही महायुतीच्या वतीने घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला.या दोन्ही भागात प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लाडक्या बहिणी इमाने इतबारे लाडक्या भावलाच मतदान करणार असल्याचे स्पष्ट सांगत होत्या.आज संध्याकाळी आम्ही प्रचाराचा नारळ फोडला.आज दोनच भाग पूर्ण झाले.मात्र दोन्ही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे शरद कालेवार यांनी सांगितले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया,सरकारने गेल्या पाच वर्षात राबविलेल्या लोकोपयोगी योजना व त्याचा नागरिकांना मिळालेला लाभ पाहता,परिवर्तन अटळ आहे.असा विश्वास कालेवार यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.