शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:सालाबादप्रमाणे आज धारीवाल कुटुंबीयांनी शहरातील झोपडपट्टीवासीयांची दिवाळी गोड केली.प्रकशभाऊ आणि आदित्य या बापलेकाने झोपडपट्टी परिसरात प्रत्येकाच्या दारात जाऊन मिठाईचे वाटप केले.
माणिकचंदजी धारीवाल हे नगराध्यक्ष असताना गावात दीपावलीच्या आनंदापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून झोपडपट्टी वासियांना मिठाईचे वाटप करण्याची परंपरा सुरू केली.त्यांच्यानंतर ही परंपरा त्यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष रसिकभाऊ धारीवाल यांनी पुढे सुरू ठेवली.गेली काही वर्षांपासून प्रकशभाऊ व त्यांचे चिरंजीव आदित्य यांनी हा सामाजिक वारसा अखंडितपणे जोपासला आहे.आदित्य हे दहा वर्षाचे असल्यापासून आपल्या वडिलांसोबत अगदी आनंदाने प्रत्येकाच्या दारात जाऊन मिठाई वाटप करताना दिसत आहे.आज त्यांनी वयाची विशी गाठली आहे. वडिलांबरोबर व्यवसायाची जबाबदारी त्यांनी खांद्यावर घेतली आहे.तरीही सामाजिक भान ते विसरले नाहीत.आज हे कुटुंब भारतातील श्रीमंत घराण्यापैकी एक घराणे आहे.तरीही ते दिवाळीत आपल्या गावातील झोपडपट्टीवासीय बांधवांना कधी विसरत नाही.एवढी मोठी माणसे आपल्या दारात येऊन आपली दिवाळी गोड करतात याची कृतज्ञ भावना या बांधवांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नेहमीच दिसून येते.आज भर उन्हात हे बापलेक मिठाई वाटप करताना दिसले.शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार,सचिव मनसुखलाल गुगळे,माजी नगराध्यक्ष रवी ढोबळे,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण,राष्ट्रवादी (अजित पवार) शहराध्यक्ष शरद कालेवार, राष्ट्रवादी (शरद पवार ) शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी, नगरसेवक अभिजीत पाचर्णे,विठ्ठल पवार,सचिन धाडीवाल,संजय देशमुख,पै अशोक पवार,प्रवीण दसगुडे,दिलीप करंजुले,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे, प्रभुलिंग वळसंगे,प्रशांत शिंदे,जयवंत साळुंके, किरण बनकर,रंजन झांबरे,आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव,उद्योजक राजेंद्र लोळगे,विनोद धाडीवाल, आशिष शिंदे,किरण पठारे सुनील बोरा,मयूर नहार,एजाज बागवान,सागर नरवडे,हाफिज बागवान,राहील शेख आदीसह धारिवाल कुटुंबीयांचे स्नेही यावेळी उपस्थित होते.