शिरूर:तरुण वय,त्यातच सामाजिक सेवेची आवड, त्यातून झालेला राजकीय प्रवेश आणि आता थेट विधानसभेत जाण्याची तीव्र इच्छा..यामुळे शिरूर हवेली मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार माऊली कटके अल्पावधीतच चर्चेत आले असून अर्ज भरताना जमलेला जनसमुदाय त्यांच्या विजयाची पताका फडकावेल अशा चर्चांनी आता जोर धरला आहे.
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
चार ते पाच महिन्यांपूर्वी विधानसभेसाठी फारसा चर्चेत नसलेला चेहरा म्हणजे माऊली कटके.ते चर्चेत आले महाकाल मोफत दर्शन सहलीमुळे (गेली अनेक वर्ष ते नागरिकांना मोफत धार्मिक सहली घडवत आहेत.)शिरूर हवेलीत ज्याच्या त्याच्या मुखात माऊलीचे नाव ऐकावयास मिळू लागले.शिरूर तालुक्यात माऊली तसे नवखे होते.मात्र धार्मिक मोफत सहल व त्याच्या उत्तम नियोजनामुळे त्यांची जोरदार चर्चा झाली. सहलीवरून आलेली मंडळी त्यांचे सर्वत्र कौतुक करू लागली.हळू हळू याची व्याप्ती वाढू लागली.तोवर शिरूर हवेली मतदार संघात आमदार अशोक पवार विरुद्ध प्रदीप कंद अशी लढत होईल.अशीच सर्वत्र चर्चा होती.महायुतीमध्ये कंद हे जरी भाजपा मध्ये असलेतरी त्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध पाहता,उमेदवारी साठी कंद राष्ट्रवादीत जाऊ शकतात किंवा दादा त्यांना तशी ऑफर देऊ शकतात.अशी शक्यता वर्तवली जात होती.थोडक्यात माऊली यांच्या उमेदवारी संदर्भात गांभीर्याने बोलले जात नव्हते.मात्र कमी वयात त्यांनी गेल्या काही महिन्यात राबविलेली रणनीती आणि त्यांची जिद्द त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी ठरली.असे म्हणावे लागेल.उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थनार्थ जमलेला समूदाय सर्वांना आश्चर्यचकित करून गेला.शिरूर शहरात जिकडे तिकडे त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांच्या वाहनांमुळे रस्ते,गल्ल्या वाहनमय झाल्याचे दिसून आले.त्यांच्या साठी शिरुकडे निघालेल्या वाहनांमुळे पुणे नगर रस्ता पुरा जाम झाला.यामुळे बऱ्याचशा लोकांना वेळेत सभास्थळी पोहचता आले नाही.
माऊली.. माऊली…माऊली
अर्ज दाखल करून आल्यावर सभेच्या ठिकाणी माऊली यांची एन्ट्री होताच त्यांना खांद्यावर घेऊन व्यासपीठाकडे आणण्यात आले.माऊली मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिल्यावर’ माऊली माऊली’ या गाण्याने सभास्थळ दणाणून तर गेलेच पण एक भावनिक वातावरणही तयार झाले.यामुळे माऊली देखील गहिवरले.महाविकास आघाडीच्या विरोधात सक्षम उमेदवारच नाही.या चर्चेला आज छेद मिळाल्याचे दिसून आले.आजच्या सभेने काटे की टक्कर होईल.अशा चर्चा ऐकावयास मिळाल्या.आजच्या सभेच्या गर्दीने अनेक नेत्यांनी माऊली मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.मागच्या निवडणुकीत आमदारांबरोबर असणारी अनेक पदाधिकारी आज माऊलींच्या व्यासपीठावर दिसून आले.माऊलींच्या भाषणाचेही अनेकांनी कौतुक केले.एका सभेने वातावरण फिरवले.माऊली चर्चेत आले. एकूणच माऊलींचे खरे रूप २३ तारखेला सर्वांना पहावयास मिळेल.