शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:हुकूमशाही,अहंकारी आणि भ्रष्टाचारी वृत्तीला शिरूर हवेली मतदारसंघातून हद्दपार करण्याचा एल्गार करीत महायुतीने आजची सभा गाजवली.आजच्या सभेत बहुतांशी सर्वच वक्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या जोरदार टीका केली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज आपला अर्ज दाखल केला.यानंतर येथील कापड बाजार पाच कंदील चौक येथे चौक येथे महायुतीची सभा पार पडली.सामान्य पदाधिकाऱ्यापासून ते प्रमुख नेत्यांपर्यंत सर्वांनी आपल्या भाषणात आमदार पवार यांच्यावर सडकून टीका केले.आमदार पवार हे हुकूमशाही अहंकारी तसेच भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व असल्याचा राग आळवला.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणले,अधिकाऱ्यांना दम देणे लोकांची तुसडेपणाने वागणे आणि अडचणीला धावून न जाणे अशा प्रकारची आमदार पवार यांची वृत्ती असून या उलट माऊली कटके यांचे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे कटके हे शंभर टक्के निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. घोडगंगा सहकारीकारखाना सुरू करण्यासाठी आम्ही मदत केली नाही असे पवार म्हणतात. मात्र ते चुकीचे सांगत आहेत. भीमाशंकर कार्यक्षेत्रात तीन लाख टन ऊस असताना आम्ही यावेळी दहा लाख टन उसाचे गाळप केले पराग कारखान्याने सहा लाख टन उसाचे गाळप केले. चांगला दरही दिला. मग घोडगंगा सुरू करण्यात कुठे माशी शिकली?असा सवाल वळसे पाटील यांनी केला.वास्तविक अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने हा कारखाना बंद पडला असल्याचे वळसे पाटील म्हणाले. अशोक पवार याला मत म्हणजे लबाड कोल्ह्याला मत अशी खरमरीत टीका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. माऊली कटके म्हणाले, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे असून मायबाप जनताच या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहे.हुकूमशाही मुजोरगिरी आता चालणार नसून ज्या जनतेने त्यांना डोक्यावर घेतले तीच जनता त्यांना वीस तारखेला पाय खाली घेतल्याशिवाय राहणार नाही. समाजात काम करत असताना सर्वसामान्य माणसाच्या हृदयात स्थान निर्माण करणे हेच खऱ्या अर्थाने राजकारण असून त्याच भूमिकेतून मी पुढे जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार एकूणच महायुती सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या असल्याने मायबाप जनता आमच्या बरोबर असणार याची मला खात्री आहे.असा विश्वासही कटके यांनी व्यक्त केला.आपल्या लाडक्या भावाला तसेच मुलाला सेवा करण्यासाठी विधानसभेत जाण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
आमदार पवारांच्या कुटुंबाने पवार साहेबांच्या गाडीवर लाथा मारल्याच्या आठवण करून देताना शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी काळे यांनी आमदार पवार हे प्रचंड स्वार्थी व्यक्तिमत्व असल्याची टीका केली.शिरूर हवेली मतदारसंघात सर्वसामान्याचे राजकारण उभे करायचे असेल तर हुकुमशाही मोडून काढावी लागेल.कारखाना बंद पाडणाऱ्याला कोणालाच भेटण्याची लायकी नाही अशी टीका दादा पाटील फराटे यांनी केली.शिकार आता टप्प्यात आली असून ती सोडता कामा नये.असा घणाघातही त्यांनी केला.कटके हे ७५ हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शशिकांत दसगुडे,सुधीर फराटे,स्वप्नील गायकवाड,दौलत शितोळे,संजय बारवकर,काळभोर,काकडे,महेश ढमढेरे,रामभाऊ सासवडे,दिलीप वाल्हेकर,राहुल पाचर्णे,चित्रा गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले. रवी काळे यानी स्वागत व प्रास्ताविक,रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार यांनी आभार मानले.