शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कोणी काहीही भूमिका घेतली असली तरी शिरूर हवेली मतदारसंघात माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांना मानणारा प्रत्येक व्यक्ती महायुतीच्या उमेदवारासोबत असून या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांना पराभूत करून पाचर्णे साहेबांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे.असा एल्गार माजी जि. प.सदस्य राहुल पाचर्णे यांनी केला.
शिरूर हवेली मतदार सघात
राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत निर्धार मेळावा घेतला.थोडक्यात ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. अशात शिरूर हवेली मध्ये भाजपा युती धर्म पाळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा पेच प्रसंगात महायुती अडकली असताना राहुल पाचर्णे यांनी त्यांच्या समर्थकांची बैठक घेऊन आपण महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला.या बैठकीस भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.यात जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष जयश्री पलांडे, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य ॲड.धर्मेंद्र खांडरे, माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भुजबळ,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके,ॲड सुरेश पलांडे, माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, भाजपा अल्पसंख्यांक सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष रेश्मा शेख,एकनाथ शेलार, सुभाष कांडगे,संजय बेंद्रे, महेश बेंद्रे, सचिन मचाले,,एच के काळे,अतुल दुर्गे,अनघा पाठक, बिराजदार,, माऊली बहिरट, पांडुरंग दुर्गे जालिंदर काळे, राहुल पवार, केशव लोखंडे, उमेश शेळके, अविनाश जाधव, हर्षद ओस्तवाल, निलेश नवले, विजय नरके, कापरे साहेब, किरण झंजाड, अंबादास कुरंदळे, जगदीश पाचर्णे आदी उपस्थित होते.
बैठकीत आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.पवार यांनी घोडगांगा कारखाना बंद पाडण्याचे पाप केले.सत्तेच्या जोरावर विरोधकांना नामोहरम करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.अशा व्यक्तीस पराभूत करणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ठ असल्याचे राहुल यांनी सांगितले.ज्या पक्षाने माझ्या वडिलांना दोन वेळा आमदार केले.ज्या पक्षाला त्यांनी फुलवले,वाढवले.त्या पक्षाचा मी ऋणी असून त्या पक्षाला जपणार असल्याचे तसेच २०१९ मधील पाचर्णे साहेबांच्या पराभवाचा वचपा काढणार असल्याचा निर्धार यावेळी राहुल व उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी बैठकीत केला.राहुल पाचर्णे यांच्या आजच्या बैठकीस भाजपाचे जुने निष्ठावान पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.माजी आमदार पाचर्णे यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे.त्यांच्या चिरंजीवांच्या आवाहनास या वर्गाने साथ दिल्यास ती कटके यांच्या दृष्टीने फार फायदेशीर ठरू शकेल.