भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मितेश गादिया यांचा राजीनामा

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:जिल्ह्यात भाजपाची चांगली ताकद असताना भाजपाला अपेक्षित जागा मिळालेल्या नाहीत. यातच पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे यांच्यावर अन्याय झाला.त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने पदावर राहणे मला उचित वाटत नाही यामुळे मी जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे अशी प्रतिक्रिया मितेश गादिया यांनी दिली.

देशात राज्यात भाजपाची सत्ता आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने विविध घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.यामुळे राज्यात भाजपाची एकूणच महायुतीची ताकद वाढलेली आहे. असे असताना जिल्ह्यात दौंड वगळता भाजपाला अद्याप एकही जागा मिळालेली नाही.भाजपाचे नेते बाळासाहेब भेगडे मंत्री असताना त्यांचे राज्याबरोबरच पुणे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान राहिलेले आहे.यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली आहे.तरीही त्यांच्यावर अन्याय झाला. मावळ येथे सुनील शेळके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली.यामुळे व्यथित झालेल्या भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते भावनाविवश झाल्याचे पहावयास मिळाले. माझ्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भेगडे यांच्यामुळे भाजपात सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मला शिरूर शहर व जिल्ह्यात चांगले काम करण्याची संधी मिळाली.आता त्यांनीच राजीनामा दिल्याने आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी पदावर राहणे उचित नाही.जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवण्यात आल्याचे गादिया यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.