शिरूर हवेली मतदारसंघात पवार विरुद्ध कटके लढत?

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

प्रवीण गायकवाड

शिरूर: शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महायुतीच्या वतीने प्रदीप कंद हे भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात असताना महायुतीने घड्याळाचे चिन्हावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कटके यांना उमेदवारी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महाविकास आघाडीचे वतीने आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रचाराला सुरुवात केली आहे.महायुतीच्या वतीने मात्र उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नव्हता. कंद हे भाजपच्या तिकिटावर आमदार पवार यांचे प्रतिस्पर्धी असतील अशी शक्यता वर्तवली जात होती.मात्र या सगळ्या शक्यता मावळल्या असून महायुतीच्या वतीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात असल्याचे समजते. कटके यांनी उमेदवार साठी मोठी फिल्डिंग लावली होती. यात त्यांना यश मिळाले असून आता पवार विरुद्ध कटके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून कटके हे शिरूर हवेली मतदारसंघात ॲक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात त्यांनी या मतदार संघातील ज्येष्ठ नागरिकांना तसेच इतरही नागरिकांना उज्जैन येथील महाकालच्या दर्शनाची मोफत व्यवस्था केली होती.त्यामध्ये वीस हजारहून अधिक नागरिकांना याचा लाभ मिळाल्याची माहिती आहे. गणेशोत्सवामध्ये देखील फटके यांनी मतदारसंघातील बहुतांशी गणेश मंडळांना भेटी देऊन त्यांना आर्थिक मदत केली होती. काही झाले तरी विधानसभा लढवायची असा त्यांनी पक्का निर्धार केला होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची माहिती पत्रके मतदार संघात वाटण्यास सुरुवात केली आहे. पक्षाची उमेदवारी असल्यास त्याचा निश्चित फायदा होईल. याची जाणीव असल्याने ते राष्ट्रवादीच्या वतीने उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. यात त्यांना यश मिळाल्याची माहिती आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतर घड्याळाच्या चिन्हावर ते ही विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. आमदार पवार यांच्या विरोधात कोणीच टिकणार नाही. अशा चर्चा आजही ऐकवयास मिळतात. माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर आमदार पवार यांच्या विरोधात त्यांच्या इतका सक्षम उमेदवार राहिलेलं नाही.असेच चित्र होते.कटके यांचे नियोजन पाहता ते आमदार पवार त्यांना चांगली लढत देतील असे चित्र दिसत आहे.एकूणच ही निवडणूक पूर्ण एकतर्फी होण्याची शक्यता यामुळे मावळली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.