शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:आमदार अशोक पवार यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असून हे अकाउंट तात्काळ बंद करून याबाबत चौकशी करावी.असे निवेदन आमदार पवार यांच्यावतीने शिरूर पोलिसांत देण्यात आले आहे.
आमदार पवार यांचे फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे त्यांच्या जवळच्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात आले. आमदारांचे स्वीय सहाय्यक योगेश इंगळे यांना कृपया आपला मोबाईल नंबर पाठवा असा मेसेज आला.यावर आमदारांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे इंगळे यांच्या निदर्शनास आले.त्यांनी याची माहिती आमदारांना दिली.आमदार पवार यांच्या वतीने तात्काळ पोलिस ठाण्यात संबंधित अकाउंट बंद करून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.मागील आठवड्यात प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांचे फेक प्रोफाइल बनवून त्यांच्या बनावट नंबर वरून अनेकांकडे पैशाची मागणी करण्यात आली होती.याबाबत त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे.अशा प्रतिष्ठित व्यक्तीचे अकाउंट हॅक होणे ही गंभीर बाब असून याचा तात्काळ छडा लावणे गरजेचे आहे.