प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या फेक प्रोफाईलद्वारे अनेकांना पैशाची मागणी
धारेवाल यांची पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:देशाचे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या नावे फेक प्रोफाइल बनवून अनेकांना पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत धारीवाल यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
धारीवाल यांनी केलेल्या तक्रारीनुसार ९९१३२१५९७६ या क्रमांकावरून धारीवाल यांचे फेक प्रोफाइल बनवण्यात आले असून या माध्यमातून अनेक लोकांना पैसे मागण्यात आले आहेत. याबाबत धारिवाल यांच्याकडे अशी तक्रार आल्यानंतर त्यांनी ट्रू कॉलरच्या माध्यमातून या नंबरची पडताळणी केली असता, हा नंबर प्रकाश धारिवाल या नावाने नोंदणीकृत असल्याचे निदर्शनास आले.धारिवाल यांची दातृत्व संपन्न उद्योगपती म्हणून देशात ओळख असून त्यांचे गेली अनेक दशकांपासून देशभर सामाजिक व व्यावसायिक संबंध आहेत.या संबंधांचा या फेक प्रोफाइलच्या माध्यमातून दुरुपयोग केला जाण्याची दाट शक्यता धारिवाल यांनी तक्रारीमध्ये व्यक्त केली आहे.नंबर कोणाच्या नावे आहे. तो कोणी व कुठे नोंदणीकृत केला, या व्यक्तीने माझ्या नावे ईमेल तसेच सोशल मीडिया अकाउंट उघडले आहे का? याबाबत सखोल चौकशीची तसेच संबंधित व्यक्तीस कडक शासन करण्याची मागणी धारीवाल यांनी केली आहे.हा नंबर धारिवाल कुटुंबीयांच्या कोणत्याही सदस्याशी निगडित नसून यावरून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्याचा धारीवाल कुटुंबीयांचा कसलाही संबंध तसेच जबाबदारी राहणार नाही.असे धारीवाल यांनी स्पष्ट केले आहे.