अशोक पवार यांच्या ताब्यात कारखाना देऊन चूक केली – रवी काळे

आज रावसाहेब दादांचे नाव कमी झाले नाहीका?

0

प्रवीण गायकवाड

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर:१९९७ साली कारखाना आमदार अशोक पवार यांच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली.असा घणाघात राष्ट्रवादी काँगेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी केला.२५ वर्ष या कुटुंबाने कारखान्याची एकहाती सत्ता उपभोगली आज या कारखान्याचा धुराडा बंद असल्याचे सांगतानाच २५ वर्ष चेअरमन असताना उसाच्या सायीचे काय झाले.असा सवालही काळे यांनी केला. जि प सदस्य राजेंद्र जगदाळे यांनीही आमदार पवार यांच्यावर खरमरीत टीका केली.

जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल शहराष्ट्रवादीच्या वतीने काळे व दिलीप वाल्हेकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना काळे यांनी आमदार पवार यांच्या बाबतीतील आपल्या मनातील भडास बाहेर काढली.काळे म्हणाले,आमदार सगळीकडे बोलताहेत,रवीला काय कमी केले.त्याला पद देऊन मोठा केला.मोठे कोणी कोणाला केले हे समोरासमोर येऊन तालुक्याला सांगा असे आव्हानही काळे यांनी दिले.१९९७ साली आम्ही घोडगंगा कारखाना त्यांच्या ताब्यात दिला.त्यावेळी कारखाना त्यांच्या ताब्यात दिला नसता तर आमदार पवार आज कुठे असते.त्यांनी आम्हाला नाही तर आम्ही त्यांना मोठे केले.मात्र आज कारखान्याची परिस्थिती पाहता कारखाना तांच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली असे काळे म्हणाले.आमदार पवार एक उदाहरण नेहमी देतात.रावसाहेब दादा पवार खरेदी विक्री संघाचे सभापती असताना आमदार पवार यांनी संघाच्या कार्यालयातील दौतीतील शाई पेनात घेतली होती.यावर रावसाहेबदादा यांनी जनतेची प्रॉपर्टीचा असा दुरुपयोग करायचा नाही असे बजावले होते.दौतीत जशी शाई असते तशी उसाची साय असते.वडिलांचे संस्कार सांगणाऱ्या आमदार पवार यांनी २५ वर्ष सत्तेत असताना उसाच्या सायीचे काय झाले असा सवाल करून आमदार पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराचे आरोप केले.

तालुक्यातील अनेक पदाधिकारी आमदार पवार यांच्या पासून दूर गेलेत.यावर भाष्य करताना काळे म्हणाले,आमदार पवार यांनी कार्यकर्त्यांना कधी ताकद दिली नाही.कार्यकर्ते,पदाधिकारी बीपीएल (दारिद्रय रेषेखाली) यादीत कसे राहतील याचा प्रयत्न केला.आमदारांचे आंतरबाह्य रूप माहीत असताना फक्त अजित दादांचे नेतृत्व आवडत असल्याने त्यांच्या बरोबर काम केले.पंधरा वर्षात काही मिळाले नाही.पदरमोड करून साथ दिली.अशी खंतही काळे यांनी व्यक्त केली.त्यांच्या मी पणामुळे अनेक जण आमदारांपासून दूर गेले.( माजी आमदार बापूसाहेब थिटे,पोपटराव गावडे तसेच बाबुराव पाचर्णे यांच्यात अजिबात असा attitude नव्हता.)खंबीर साथ देणारी माणसे त्यांना सांभाळता आली नाही.जे जवळ आहेत त्यांच्याशी तरी प्रामाणिक रहा असा सल्ला देतानाच नाही राहिलात तर फार अवघड चित्र निर्माण होईल.(घोडगंगेमुळे तर झालेच आहे) असा इशाराही काळे यांनी दिला.राजकारणात डावपेच असतात.मात्र आख्ख राजकारणच डावपेचाच नसावे.असे सांगताना,इतरांप्रती मानसिक दारिद्र्य मनात बाळगणारी माणसे कधीच मोठी होत नाही.त्यांचा एक ना एक दिवस अंत होतोच.असा टोलाही काळे यांनी आमदार पवार यांना लगावला.

माझ्या वडिलांच्या नावाने कारखाना असल्याने त्यांचे नाव कमी होऊ देणार नाही असे आमदार पवार म्हणाले होते.आजच्या कारखान्याच्या परिस्थितीने रावसाहेब दादांचे नाव कमी झाले नाही का? असा सवाल जगदाळे यांनी केला.ते म्हणाले गेली पाच वर्ष दबावात गेले.फार ताणल्याने अखेर तुटले.आता मोकळे वाटतेय. हाजी हाजी करण्याचे दिवस आता गेले.तालुक्यात दुसरे नेतृत्व तयार होऊ नये म्हणून प्रयत्न केला गेला.ही परंपरा आता मोडीत निघणार असून जो काम करेल त्याला अजित दादा गटात निश्चित संधी मिळणार असा दावा जगदाळे यांनी केला.आम्हाला दादांपर्यंत पोचू दिले जात नव्हते.मात्र रवी काळे यांच्या बरोबर पाच वेळा दादांना भेटण्याची, त्यांना कामे सांगण्याची संधी मिळाल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.