जाधव,नरवडे, शेख व सय्यद यांचे उपोषण मागे

शिरूर मध्ये मराठा आरक्षणासाठी एकजुटीचे दर्शन

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेताच शहरातील चार तरुणांनी देखील तहसीलदार तसेच आपल्या मुलांच्या हस्ते सरबत घेऊन तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले.

         जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अविनाश जाधव,सागर नरवडे,राहील शेख व कलीम सय्यद यांनी  उपोषण सुरू केले होते.गेल्या तीन दिवसात मुस्लिम समाजाबरोबरच इतर समाजानेही या तरुणांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला होता.आमदार अशोक पवार व जि.प.च्या माजी सभापती सुजाता पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.दरम्यान आज जरांगे पाटील यांच्याशी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.तिकडे त्यांचे उपोषण सुटल्यावर या तरुणांनी देखील तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,पोलिस निरीक्षक संजय जगताप,शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार व कुटुंबियांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले.विनोद भालेराव,मंगेश खांडरे,अमोल शहा,संतोष शितोळे,तुकाराम खोले,किरण बनकर,रुपेश घाडगे, महेबुब सय्यद,अनिल बांडे,ॲड.रवींद्र खांडरे, ॲड.विक्रम पाटील,सुनील जाधव,निलेश जाधव,प्रकाश थोरात,मितेश गादिया, प्रितेश गादिया,हाफीज बागवान,सुशांत कुटे,अविनाश घोगरे,रवी गुळादे,वसीम सय्यद,एजाज बागवान,संपत दसगुडे,विजय नरके,निलेश नवले,रज्जुद्दिन सय्यद,रामा इंगळे,सतीश गवारे,टिंकू ओस्तवाल,मुश्ताक शेख, महेंद्र येवले,स्वप्नील रेड्डी,शेखर दळवी आदी यावेळी उपस्थित होते.
        प्रा.सतीश धुमाळ यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या या चार तरुणांचे कौतुक करताना आरक्षण प्रश्नासाठी येथून पुढेही अशाच प्रकारे तरुणांच्या सहभागाची अपेक्षा व्यक्त केली.जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सुरू केलेला लढा व त्यास मराठा बांधवांसह इतरही समाजाचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता या लढ्याला निश्चित यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला.ॲड.सुभाष पवार
यांनी उपोषण कर्त्यांसह शहरातील विविध जाती धर्माच्या बांधवांचे मराठा आरक्षणासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.