शिरूरनामा न्युज नेटवर्क
शिरूर: बीओटी बस स्थानकात रिक्षा चालकांना जागा मिळवून देण्याबरोबरच त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करू.असे आश्वासन शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी यांनी दिले.
शिरूर येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत शाखा सुरू करण्यात आली. एस टी बस स्थानकाजवळ या शाखेच्या फलकाचे अनावरण महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे व कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कुरेशी बोलत होते.शिरूर एस टी बस स्थानक बीओटी अंतर्गत विकसित करण्यात आले आहे.एस टी जसे प्रवासी वाहतूक करते तसे आम्ही देखील प्रवासी वाहतूक करतो.म्हणून आम्हाला या स्थानकात स्टँड साठी जागा उपलब्ध व्हायला हवी.याबाबत सहकार्य करण्याची मागणी कुरेशी यांच्याकडे केली असता,कुरेशी यांनी आमदार पवार यांच्या सहकार्याने सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.रिक्षाचालक बांधवांच्या आरोग्यासह इतरही प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्नशिल राहण्याचे सूतोवाच कुरेशी यांनी केले. राज्यामध्ये बहुतांशी ठिकाणी बीओटी तत्वावर एस टी बस स्थानके विकसित केली जात असून अशा प्रत्येक स्थानकात रिक्षा चालक बांधवांना स्टँड साठी जागा देण्याची मागणी करणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.वेळ पडल्यास यासाठी संघर्ष करू असे सांगतानाच संघर्षातूनच राज्यातील रिक्षा चालक बांधवांना न्याय मिळवून दिल्याचे कांबळे यांनी सांगितले.सहा हजार रिक्षा चालक बांधवांना घरकुल मिळवून दिल्याची माहिती त्यांनी दिली.या बांधवांसाठी कल्याणकारी मंडळ सुरू करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक उत्पन्नाची मर्यादा असल्याने रिक्षाचालकांना स्वतःची घरे घेणे शक्य होत नाही.या बांधवांसाठी माफक दरात घरे देण्याचा मानस शिरूर शहर विकास आघाडीचे सचिव मनसुखलाल गुगळे यांनी व्यक्त केला.गुगळे यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या इंग्रजी माध्यम शाळेत रिक्षा चालकांच्या २५ मुलांना केवळ पाच हजार रुपये फी मध्ये प्रवेश देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.रिक्षाचालक बांधवांनी कधीही आवाज दिल्यास त्यांच्या हाकेला धावून जाण्याचा विश्वास जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनी दिला.वाहतूक विभागाचे राजेंद्र वाघमोडे,महाराष्ट्र रिक्षा ब्रिगेड महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब ढवळे,पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख,उपाध्यक्ष संजय शिंदे,उपाध्यक्ष मुराद काझी,अरशद अन्सारी,कार्याध्यक्ष विलास केमसे, पुणे शहर संघटक मोसिन शेख,हडपसर अध्यक्ष निशांत भोंडवे,मध्यवर्ती अध्यक्ष अँथोनी आदी यावेळी उपस्थित होते.महाराष्ट्र रिक्षा पंचायत शिरूरचे अध्यक्ष प्रकाश लोंढे,उपाध्यक्ष अखिल शाह,खजिनदार वसीम शेख ,उपखजिनदार महेश धुमाळ, सचिव नागेश भोसले,उपसचिव विलास शेंडगे, कार्याध्यक्ष राजू गायकवाड, उपकार्याध्यक्ष मोहसिन तांबोळी चिटणीस विजय घावटे उपचिटणीस चंद्रकांत घोडके स्टॅन्ड प्रमुख जावेद खान उप स्टॅन्ड प्रमुख लखन करडे,सतीश करडे, सल्लागार भाऊसाहेब शेजवळ सल्लागार सुभाष ढवळे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.