शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसेच शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चां.ता.बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी खेळ स्पर्धेत येथील आर एम डी स्कूल व ज्युनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
चां.ता. बोरा महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या आंतरशालेय मैदानी खेळ स्पर्धेत तालुक्यातील ६२ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात आर एम डी स्कूलच्या २१ मुली व २२ मुलांचा समावेश होता.यापैकी २१ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळवले.तर १० विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.मुख्याध्यापिका अश्विनी घारु यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचे शिक्षक अमोल वाघमारे यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली.स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी कडी मेहनत घेतल्याने त्यांना स्पर्धेत यश मिळाले असून जिल्हास्तरीय स्पर्धेतही ते बाजी मारतील असा विश्वास मुख्याध्यापिका घारू यांनी व्यक्त केला.शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम,शाळेचे चेअरमन शिरिष बरमेचा ,शालेय समितीचे सदस्य धरमचंदजी फुलफगर,राजेंद्र भटेवरा,शिरिष गादीया तसेच तालुका क्रीडा अध्यक्ष शरद दत्तू दुर्गे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.