शिरूर शहर कडकडीत बंद

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरुर:मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला. तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात  मराठा बांधवासह विविध पक्ष,संस्था संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले.
              बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चास प्रारंभ करण्यात आला.जुन्या पुणे नगर रस्त्यावरून मोर्चा तहसिल कार्यलयावर नेण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाबरोबरच,एक मराठा लाख मराठा,आरक्षण आमच्या हक्काचे या घोषणा यावेळी देण्यात आल्या.यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाचे,शोभना पाचंगे,संभाजी कर्डिले ,रुपेश घाडगे ,रमेश दसगुडे , सुनील जाधव, नितीन पाचर्णे श्यामकांत वर्पे,सचिन जाधव, संजय बारवकर ,बाबूराव पाचंगे प्रभाकर डेरे,ॲड.किरण आंबेकर,रवींद्र खांडरे, संजय ढमढेरे,राजेंद्र जाधवराव, प्रियंका बंडगर,जिजाबाई दुर्गे,शशिकला काळे,उषा वाखारे, विजया टेमगिरे,वैशाली गायकवाड,श्रुतिका झांबरे,सविता बोराडे,वैशाली ठुबे,ज्योती हांडे, प्रियंका धोत्रे,प्रा.अशोक शेळके,डॉ.नारायण सरोदे ,संजय शिंदे,प्रकाश थोरात,पोपटराव ढोकले,सुशांत कुटे,अविनाश जाधव, रजुद्दिन सय्यद,राहील शेख,कुणाल काळे,उमेश शेळके,अनिल डांगे,हाफिज बागवान,ॲड.परेश थोरात,अनिल सोनवणे,निलेश जाधव,सागर नरवडे,अविनाश घोगरे,बाबाजी गलांडे,गणेश घाडगे,महेश देशमुख,रावसाहेब चक्रे,अशोक भोसले यांच्यसह विविध राजकीय पक्ष ,सामजिक संघटनाचे पदाधिकारी आदी मोर्चात सहभागी झाले.मनोज जरांडे यांनी केलेल्या मागण्या मान्य कराव्यात,संपूर्ण मराठा समाजाला कुणबी  प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे.आंदोलक मराठा समाजबांधवांवर दाखल गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.जालना येथील लाठीमारीच्या घटनेच्या यावेळी निषेध करताना दोषीवर कारवाईची मागणी करण्यात आली.
         मोर्चा तहसिल कार्यालयावर गेल्यावर मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे,ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात,कॉग्रेस आयचे महेशबापू ढमढेरे,आखिल भारतीय मराठा महासंघाच्या उर्मिला फलके,दिग्दर्शक भाउराव क-हाडे ,शिरुर वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड.प्रदीप बारवकर,शिवसेनेचे तालुकाप्रमुख पोपटराव शेलार,शहरप्रमुख संजय देशमुख,गणेश जामदार,समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे प्रा.सतीश धुमाळ,नगरसेवक विनोद भालेराव,पोपटराव बो-हाडे,जैन युवा परिषदेचे प्रकाश बाफना,राजेंद्र कोरेकर, रामलिंग संस्थेच्या राणी कर्डीले,संगीता शेवाळे,आदीनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रकाश थोरात यांनी सूत्रसंचालन, रुपेश घाडगे यांनी आभार मानले.मराठा क्रांती मोर्चाच्या आवाहनाला शिरूरकरानी प्रतिसाद देत व्यवहार बंद ठेवले.पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.