शिरूर:अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना )येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेला लाठीहल्ला निषेधार्ह असल्याचे आमदार अशोक पवार यांनी.पत्रकारांशी बोलताना सांगितले.अशा प्रकारचा लाठीहल्ला कोणावरही होता कामा नये.अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट.पासून उपोषण सुरू केले आहे.त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा आमदार पवार यांनी निषेध केला.पवार म्हणाले,आंदोलक रत्यावर येण्यापूर्वीच सरकार व प्रशासनाने त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या प्रश्नाचे निराकरण करणे,त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे तसेच जनक्षोभ उसळण्याआधी परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळणे गरजेचे असते.जालन्यातील आंदोलकांच्या बाबतीत हे न घडल्याने आंदोलक रस्त्यावर आले.त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला.हवेत गोळीबारही करण्यात आला.ही बाब निश्चितच निषेधार्ह आहे.