नाट्यछटा स्पर्धेत ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे जिल्हास्तरीय सुयश

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क 
शिरूर:बाल रंगभूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाट्यछटा स्पर्धेच्या अंतिम फेरीत ज्ञानगंगा विद्यालयाच्या वैष्णवी सिदनकर या विद्यार्थिनीने मोठ्या गटात प्रथम तर लहान गटात अनुश्री सुरवसे हिने तृतीय क्रमांक पटकाविल जिल्ह्यातील २८ केंद्रातून एकूण १९८ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
         बाल रंगभूमी परिषद पुणे व निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने नट श्रेष्ठ अविनाश देशमुख तालुकास्तरीय ‘नाट्यछटा स्पर्धेचे’येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालयात आयोजन करण्यात आले होते.यात १५७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात १८ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.( गट १)स्वरा मुसळे, इशानी निकम, प्रांजल डांगे,अनुश्री सुरवसे, (गट २) श्रावणी कदम,मीत पाटील,साई वाकचौरे,वेदिका चिकणे,शिवण्या वराळ,(गट ३)संतोषी भेंडे,(गट ४) वैष्णवी सीदनकर या ज्ञानगंगाच्या ११ विद्यार्थ्यांचा यात समावेश होता.जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने उत्कृष्ट सादरीकरण केले.यात ज्ञानगंगाच्याच वैष्णवी सिदनकर या विद्यार्थिनीने प्रथम तर लहान गटात अनुश्री सुरवसे या विद्यार्थिनीने तिसरा क्रमांक पटकावून ज्ञानगंगा विश्वविद्यालयाच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला.ज्ञानगंगा एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ.राजेराम घावटे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमच्या संस्थेचे ध्येय असल्याचे नमूद केले.विविध स्पर्धांचे व्यासपीठ शाळा उपलब्ध करून देत आहे.विद्यार्थीही मेहनत करून या स्पर्धांमध्ये यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवत असल्याचे समाधान असल्याचे डॉ.घावटे म्हणाले.बालरंग भुमीच्या दिपालीताई शेळके यांनीही ज्ञानगंगा विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.ज्ञानगंगा सारख्या शाळा विद्यार्थ्यांना देत असलेले प्रोत्साहन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मोलाचे ठरेल असेही शेळके म्हणाल्या.
         यशस्वी विद्यार्थ्यांना सीईओ नितीन घावटे,प्राचार्य संतोष येवले,मुख्याध्यापिका सुनंदा लंघे, पर्यवेक्षिका जयश्री खणसे व सर्व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.
Leave A Reply

Your email address will not be published.