शिरूर:काँग्रेसला सत्तर वर्षांत जे करता आले नाही ते मोदी सरकारने नऊ वर्षात करून दाखवल्याचा दावा आमदार महेश लांडगे यांनी पत्रकार परिषदेत केला.त्यांच्याकडे काही करण्याची मानसिकता नव्हती,सकारात्मक दृष्टिकोन नव्हता.आता ते कोणत्याही समस्येचे राजकारण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप लांडगे यांनी केला.
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
मोदी सरकारचे नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी@9 हे अभियान पक्षाने हाती घेतले आहे.या माध्यमातून नऊ वर्षात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम केले जाणार आहे.शिरूर लोकसभा मतदार संघातील बेट मंडल आयोजित पत्रकार परिषदेत लांडगे यांनी ही माहिती देतानाच काँग्रेसवर टीका केली.मोदी@9 अभियानांतर्गत विकासतीर्थ या शीर्षकाखाली नऊ कार्यक्रम घेतले जाणार असून प्रमुख नागरिक संमेलन ज्यात डॉक्टर्स वकील व शिक्षक यांच्याशी चर्चा घडवून आणली जाणार आहे.सोशल मीडिया संमेलन,विशाल रॅलीचे आयोजन केले जाणार आहे.योगा दिन साजरा केला जाणार आहे.ज्येष्ठ कार्यकर्ते व्यापारी,लाभार्थी संमेलनात या घटकांशी चर्चा केली जाणार आहे.,व्हर्च्युअल रॅलीमध्ये मंडलातील बुथ कार्यकर्त्यांशी मोदी चर्चा करणार आहेत.संपर्क अभियानांतर्गत नऊ वर्षात केंद्राने राबवलेल्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे घरोघरी वाटप केले जाणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले.अॅड धर्मेंद्र खांडरे यांनी यावेळी नऊ वर्षात मोदी सरकारने केलेल्या विविध विकास कामांची विस्तृत माहिती दिली.शिरूर आंबेगाव विधानसभा प्रभारी जयश्री पलांडे,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अॅड.धर्मेंद्र खांडरे,शिरूर बेट मंडलाचे अध्यक्ष सतीश पाचंगे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके,अनिल नवले,विजय पवार,पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर,भाजपा नेते सुरेश थोरात,किसान मोर्चाचे अध्यक्ष माऊली साकोरे, डॉ.ताराचंद करळे, जयसिंग येरडे,,मारुती शेळके,श्रीकृष्ण देशमुख,अजित साकोरे, डॉ.राजेंद्र ढमढेरे,संयोगिता पलांडे आदी यावेळी उपस्थित होते.
गतिमान सरकार,प्रचंड काम केलेले सरकार तसेच भ्रष्टाचारमुक्त सरकार अशी मोदी सरकारची जगभर ओळख झाल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले.यावर कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशन सरकारा या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बीजेपी सरकार गेले.महाकाल कॉरिडॉर साठी मोठा खर्च केला.तरीही एका वाऱ्याने सहा मुर्त्या कोसळल्या.हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाहीका?असा प्रश्न केला असता,लांडगे म्हणाले,आरोप करणाऱ्यांना विकास करता आला नाही.केवळ झालेल्या विकासाला वेगळी दिशा देण्याचा प्रकार आहे.भ्रष्टाचार सिद्ध करता आला पाहिजे,त्याला आधार असायला हवा.उज्वला गॅस योजेतील महिला आता सिलेंडरचे दर वाढल्याने गॅसचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आणले असता,केंद्रीय नेतृत्व सक्षम आहे.ते चांगला निर्णय घेतील असे उत्तर लांडगे यांनी दिले.बाळासाहेब लंघे यांनी सूत्रसंचालन केले.सतीश पाचंगे यांनी आभार मानले.