शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुखपदी सुरेश गाडेकर

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुखपदी येथील सुरेश गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या तालुका समन्वयक पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

          राम राऊत हे बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे राज्याचे प्रमुख तर ज्ञानेश्वर धुळगंडे हे सहप्रमुख आहेत.यांनी गाडेकर यांच्यावर या कक्षाच्या तालुकाप्रमुखपदाची तसेच डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब,गरजू तसेच आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये राखीव खाटा उपलब्ध करून देणे,निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांना पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात मदत करणे,ज्या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्ध आहे तेथे रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे आदी प्रकारचे कार्य केले जात असून तालुक्यात गाडेकर यांनी अशा प्रकारचे कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तालुक्यातील ज्या रुग्णांवर विविध प्रकारच्या गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करण्याची वेळ येईल अशा रुग्णांना पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी,श्री. सिद्धिविनायक ट्रस्ट तसेच टाटा ट्रस्ट या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी मदत पक्षाच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधण्याच्या गाडेकर यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
           माझ्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी ही मला मिळालेली संधी असून या माध्यमातून तालुक्यातील रुग्णांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे गाडेकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.