भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी-खासदार कोल्हे

कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

प्रवीण गायकवाड

शिरूर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी समाचार घेतला असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.याबाबत त्रिवेदींसह भाजपाने महाराष्ट्राचे माफी मागावी अशीही मागणी केली आहे.भाजपा बाबत कोल्हे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहता कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे?

            खासदार कोल्हे यांची भाजपाशी जवळीक वाढल्याची अनेक दिवसापासून चर्चा आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तर या चर्चेला उधाण आले आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्व देऊनही खासदार कोल्हे हे भाजपात का चालले आहेत यावर सध्या सोशल मीडियावरील चॅनेल मध्ये चर्चाही घडताहेत.अशी चर्चा घडत असली तरी खासदार कोल्हे यांनी याबाबत आपले मत अद्याप प्रदर्शित केलेले नाही.अशातच आज त्यांनी आपल्या अमोल टू अनमोल या यूट्यूब चैनल वर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यात त्यांनी भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. याबाबत बोलताना ते म्हणाले, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते असोत महाराष्ट्राचे राज्यपाल असोत हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत. ते महाराजांबद्दल अशी वक्तव्य का करीत आहेत,त्यांना नेमकं काय खूपतय असा सवाल खासदार कोल्हे यांनी केला आहे.महाराजांचा खरा इतिहास विशद करतानाच महाराज नक्कीच देव नाहीत मात्र आम्हाला देवा पेक्षा कमी नाहीत असे स्पष्ट केले. त्रिवेदींनी आपले वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतानाच भाजपाने शिवाजी महाराजांबद्दल आपली नेमकी काय भूमिका आहे हे महाराष्ट्र समोर स्पष्ट करावे तसेच महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी आपल्या व्हिडिओमध्ये केली आहे.
               मागील काही दिवसांमध्ये खासदार कोल्हे यांच्याबाबत घडत असलेली चर्चा पाहता आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी भाजपा बद्दल घेतलेली आक्रमक भूमिका ऐकून निश्चितच अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील.जर खरंच खासदार कोल्हे भाजपाच्या वाटेवर असते तर त्यांनी भाजपा बाबत अशी आक्रमक भूमिका घेतली नसती.खासदार कोल्हे यांचे शिवाजी महाराजां प्रति असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. आपल्या दैवताबद्दल वारंवार एखादा पक्षाचे प्रवक्ते अशा प्रकारची बेताल वक्तव्य करत असतील,त्याबाबत त्या पक्षाची भूमिका स्पष्ट नसेल तर खासदार कोल्हे यांना हे निश्चितच आवडणार नाही आणि अशा पक्षाशी ते कधीही जवळ करणार नाही.असे मानायला हरकत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.