२४ वर्षांनी बरेच काही बदलेले होते…..कोणी अधिकारी,कोणी व्यावसायिक,कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनिअर झाले होते….अनेक विद्यार्थिनी विवाहानंतर गृहिणी झाल्या होत्या…या सर्वांविषयी शिक्षक जाणून घेत.होते…यातील अनेक विद्यार्थी एकमेकाला थेट २४ वर्षांनी भेटले होते….त्यामुळे ते आजच्या स्नेहमेळाव्यामुळे भारावून गेल्याचे दिसून आले….गप्पांची मेहेफिल अशी काही रमली की जेवणाचेही भान राहिले नाही..मात्र स्नेहभोजनाची व्यवस्था केल्याने अखेर विद्यार्थ्यांनी यासाठी रांगा लावल्या….जेवणाच्या टेबलवरही गप्पांचा फड रंगला.५ वाजले तरी शाळा सुटल्याची बेल काही वाजेना…सगळे इतके काही रमले की ७ वाजले तरी वर्ग सुटेना…शिक्षकांनाही घरी जाण्याची ओढ लागेना………..विद्यार्थीदशे
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:परेड विश्राम,परेड सावधान.. एकसाथ राष्ट्रगीत शुरू कर….८४ वय वर्षाच्या शिक्षकाने सूचना करताच ४१ वय वर्षाच्या विद्यार्थांनी एकसुरात राष्ट्रगीत सुरू केले…२४ वर्षांनी पुन्हा शालेय जीवनात रमण्याचा मोह या विद्यार्थ्यांना आवरला नाही… निवृत्त शिक्षक व शाळेतून निवृत्त झालेले विद्यार्थी यांनी एकत्र येत एकमेकाला अविस्मरणीय दिवसाची अनुभूती दिली.
२००० साली दहावी पास झालेल्या विद्याधामीय अर्थात विद्याधम प्रशालेतील विद्यार्थ्यांचा आज २४ वर्षांनी पुन्हा एकदा वर्ग भरला.नोकरी व्यवसाय निमित्त राज्यातील विविध भागात विखुरलेले हे विद्यार्थी या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले.२००० साली या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आवर्जून आज उपस्थित होते. त्यावेळी मुख्याध्यापक असलेले करंदीकर सरांनी आज पुन्हा एकदा मुख्याध्यापकपदाची भूमिका पार पाडली.व्यासपीठावर सर्व शिक्षक विराजमान झाले.खाली विद्यार्थी, विद्यार्थिनी एका रांगेत उभे राहिले.या कुंदे तुषार हार धवला…..या श्लोकाने परिपाठाची सुरुवात करण्यात आली.यानंतर ८४ वर्षाच्या करंदीकर सरांनी,परेड विश्राम,परेड सावधान अशा सूचना देताच विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सुरू केले.यानंतर भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत…ही प्रतिज्ञाही घेण्यात आली.पसायदान झाल्यावर…..वर्ग भरला…मात्र तो खोलीत न भरता शाळेच्या आवारात भरला…आज ना गणिताचा ना सायन्सचा तास होता…तास होता तो गप्पांचा,एकमेकांची माहिती जाणून घेण्याचा,करमणुकीचा…अशातही निवृत्त मुख्याध्यापक अनिल तांबोळी यांनी आपल्या मनोगतात विविध मुद्द्यांना स्पर्श करताना, उत्तुंग भरारी घ्या, यश मिळवा,मोठे व्हा मात्र समाजात एक चांगला माणूस म्हणून आपली ओळख निर्माण करा.असा मोलाचा सल्ला दिला. निवृत्त मुख्याध्यापक व्ही डी कुलकर्णी, धनाजी खरमाटे, योगेश जैन,बाळासाहेब गायकवाड,लक्ष्मीनारायण सारडा,विद्याधर पोटे,रंगनाथ बनकर आदी निवृत्त शिक्षक यावेळी आवर्जून उपस्थित होते.