रमजानच्या उपवासातही ‘त्यांनी ‘ प्रामाणिकपणे निभावले कर्तव्य.
शिरुरच्या तहसिलदार लैला शेख यांचे कौतुकास्पद काम
शिरूर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर प्रत्येक जण आपले योगदान देत आहे.मात्र रमजानचे कडक उपवास असताना तहसिलदार लैला शेख यांनी दररोज पंधरा त्रास झटून पारिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय मोलाची कामगिरी बजावली आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून १३ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू झाले. लॉकडाऊनच्या कालावधीत परिस्थीती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी तालुका प्रशासन प्रमुख म्हणून तहसिलदारांवर आहे.तहसिलदार शेख यांनी ही जबाबदारी सुरुवातीपासून समर्थपणे पेलली.मात्र त्यांची खरी परिक्षा सुरू झाली ती रमजान महिन्याची सुरुवात झाली तेव्हा. कडक उपवास व त्यातच कडक ऊन याचा सामना करीत त्यांना कर्तव्य बजावयाचे होते.मात्र अतिशय धैर्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावले.२९ दिवसांपूर्वी तहसिलदार शेख यांचे रमजानचे उपवास सुरू झाले. मुस्लिम बांधवांसाठी रमजान पवित्र महिना समजला जातो.या महिन्यात महिनाभर उपवास केले जातात.हे उपवास फार कडक असतात. दिवसभर काही खायचे नसते.पाणी देखिल ग्रहण केले जात नाही.असे उपवास असताना तहसिलदार शेख यांनी आत्मविश्वासाने आपले काम सुरू ठेवले.
तालुक्याच्या काही भागात कोरोनाचे रूग्ण आढळले. मात्र त्या भागात प्रादूर्भाव वाढू नये म्हणून तहसिलदार शेख यांनी तातडीच्या उपाययोजना केल्या परिणामी प्रादूर्भाव रोखला गेला.लॉक डाऊनच्या कालावधीत राज्यातील तसेच परराज्यातील कामगार, मजूर आपल्या घरी जाण्यासाठी व्याकूळ झाले होते. शेकडो कामगार आपल्या कुटुंबियांसमवेत पायी निघाल्याचे चित्र होते.अशा कामगारांसाठी तहसिलदार शेख यांनी शिरूर, कारेगांव, कोरेगाव येथे लेबर कॅम्प उभारले. तेथे त्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. लॉकडाऊनमुळे शेकडो आर्थिक दुर्बल कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून तहसिलदार शेख यांनी पुढाकार घेऊन तालुक्यात जीवनावश्यक वस्तूंचे ४० हजारांहून अधिक किट लोकांपर्यंत पोचवले. तसेच विविध स्वयंसेवी, सामाजीक संस्था संघटनांच्या माध्यमातून शेख यांनी हातावर पोट असलेल्या शेकडो स्थलांतरीत कुटुंबांनाही जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करून दिले.
राज्य शासनाने परराज्यातील कामगार, मजूरांना बसने त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्याचे जाहीर केले. तेव्हा विविध राज्यातील लोकांसाठी शिरूर येथे बसची व्यवस्था करण्यात आली होती.यामुळे तळेगांव दाभाडे, चाकण, आंबेगाव, दौंड,पुरंदर तालुक्यातून कामगारांचे लोंढे शिरूरमध्ये झाले. या लोंढ्यामुळे शिरूर शहरात कोरोनाचा शिरकाव होतोकी काय याची चिंता होती. मात्र तहसिलदार शेख यांनी सलग आठ दिवस स्वतः तेथे उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याने शहर कोरोनामुक्त राहिले.तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील तसेच परराज्यातील सर्वच नागरिकांची काळजी घेत असताना शेख यांनी कोरोनाच्या लढयात त्यांना साथ देणाऱ्या आपल्या सर्वच सहकाऱ्यांचीही व्यवस्थित काळजी घेतली. तीन आठवड्यापूर्वी येथील लेबर कॅम्पमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला. शेख यांनी तेथे जाऊन केक कापून मुलीच्या जन्माचे स्वागत केले. शेख यांना दोन वर्षाचा मुलगा आहे.कोरोना योध्दा म्हणून काम करीत असताना मुलाला जास्त वेळ देता येत नाही.मात्र तरीही त्याचीही काळजी घेताना त्या दिसतात.पति इंडियन आर्मी मध्ये असून पत्नी कोरोना योद्धा म्हणून चांगले काम करीत असताना पति देश रक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. हे विशेष.कोरोनाची लागण होऊ नये म्हणून नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे… स्टे होम… स्टे सेफ असे नागरिकांना वेळोवेळी सुचित केले जात आहे,आवाहन केले जात आहे.तहसिलदार शेख मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तसेच महिनाभराचे कडक उपवास असतानाही अविरतपणे आपले कर्तव्य बजावत आहेत.
![]() |
ReplyForward
|