बँक ऑफ इंडियाच्या वतीने किराणाकिटचे वाटप

0

शिरूर : बँक ऑफ इंडियाच्या शिरूर शाखेच्या वतीने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ‘उपक्रमांतर्गत शहरातील शंभर गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दररोज मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नागरिकांसमोर रोजच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशात या घटकांच्या मदतीसाठी प्रशासनाबरोबरच शहरातील अनेक दानशूर व्यक्ति,संस्था, संघटना पुढे आल्या आहेत. समाजाप्रती आपलेही दायित्व आहे. या भावनेतून बॅक ऑफ इंडियाच्या शिरूर शाखेने देखिल त्यांच्या’कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ‘ या उपक्रमांतर्गत शहरातील शंभर कुटुंबांच्या मदतीसाठी हात पुढे केला. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने शंभर गरजूंचा शोध घेतला. नगरपरिषद मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करीत गरजूंना किटचे वाटप करण्यात आले. बॅक ऑफ इंडिया ही उत्कृष्ट बँकींग सेवेबरोबरच सामाजिक भान जपणारी बँक असल्याचे प्रतिपादन बँकेचे पुणे झोनल मॅनेजर, मुख्य प्रबंधक, व्ही. सुब्रमण्यम् यांनी यावेळी केले. नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी बँकेच्या सामजिक उपक्रमाचे कौतुक केले.

नगराध्यक्षा वाखारे,मुख्याधिकारी महेश रोकडे,बँक ऑफ इंडियाचे पुणे झोनल मॅनेजर, मुख्य प्रबंधक, व्ही. सुब्रमण्यम्, ऑफिसर असो.चे जनरल सेक्रेटरी बाबू मडूर, स्टाफ युनियनचे सेक्रेटरी शिरीष राणे,स्टाफ युनियनचे व्हाईस प्रेसिडेंट दिलीप ठोंबरे, शिरूर शाखेच्या मुख्य प्रबंधक राउत,उपप्रबंधक मिलिंद कर्वे,शाखेचे कायदा सल्लागार सुभाष जैन उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.