घरचं दु:ख बाजूला सारून कोरोना रुग्णांसाठी झटणारी रणरागिणी!

0

पतीवर शस्त्रक्रिया झालेली असताना ही कोरोनाग्रस्त रुग्णांना जीवदान देण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील एक नर्स कर्तव्य बजावत आहे. दोन्ही मुलांना हाताच्या अंतरावर ठेवत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना त्या सेवा देत आहेत.

47 वर्षीय नर्स मेघा सुर्वे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात कार्यरत आहेत. 1996 पासून म्हणजेच गेल्या 24 वर्ष त्या कॅज्युअल्टी विभागातील रुग्णांना सेवा देत आहेत. कोरोनामुळे शहर संकटात आल्यावरही त्या इथे ही मागे नाहीत. रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करणे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवणे, अहवालानंतर त्यांच्यावरील उपचार ठरवणे हे सगळं काम सध्या त्या करत आहेत. कोरोना योद्धा म्हणून त्या आपलं कर्तव्य पार पाडत आहेतच, पण पत्नी म्हणूनही त्यांचा लढा सुरु आहे. कारण त्यांच्या पतीवर शस्त्रक्रिया झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.